कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

Posted by
Er Aniket B Modake

नाते जपतांना..


हलकासा धक्का काय बसतो
खटकण ! काचेला तडा जातो..
मनाचही अगदी तसंच !
तोच तडा ! मनालाही जातो
स्वतःला सवरण्या आधीच
मन विखुरलं जातं तुकड्या तुकड्यात !
काही कळण्याआधीच नाती
गोती सारं संपत जातं
विखुरलेल्या त्या काचेच्या तुकड्याप्रमाने..
गोळा करायचं म्हटलं तर !
अनवाणी हाताने शक्य होत नाही
ते विखुरलले तुकडे
हाताला जखमा द्यायला लागतात
होणारा त्रास विसरुन !
कितीही एकत्र बांधून ठेवले हे विखुरलेले तुकडे
तरी ते टोचनारच कधी ना कधी
म्हणून मग द्यायचे का फेकून?
फक्त काच असती तर नक्कीच !
पण हे फक्त काचेचे तुकडे नाहीत
बंध आहेत धागे आहेत प्रेमाचे
फक्त तीक्ष्ण झालेत ! सुई च्या धारदार टोकाप्रमाने..
मला खात्री आहे नात्याचे हे धारदार तुकडे !
बदलतील एक दिवस ! मऊ आणि कोमल फुलांमध्ये..
ऊन वारा आणि पाऊस झेलत झेलत
झाडा च्या विखुरलेल्या बियाप्रमाने !
येतील एकत्र गहनरुपी बदलत्या वेळेसोबत..
फुटेल कुठेतरी ! नात्यालाही मायेचा अंकुर
परत एकदा होईल नात्यांची गर्दी
त्या बागेतील रोपट्यांसारखी !
एकत्रित आणि एकसंघ अशी....😊
------------------------------------------------------

शोध संपणार कधी?


ही गर्दी सारी माणसांची
माणूस माणसातला
ओळखाल कधी?
एक माणूस असा शोधतो मी
सांग माणसा !
हा शोध संपणार कधी?
हाव स्वार्थी जगण्याची
सोडून दे आता
आस स्वार्थ साधण्याची
गरज माणसा !
आज माणूस जपण्याची
सांग माणसा !
हे बदलणार कधी?
ही वेळ माणसाने
माणसा सम जगण्याची
समजुनी एकमेकांना
ठेव जाणीव एकमेकांची
उचित समय येता
गरज माणुसकी जपण्याची
सांग माणसा !
हे बदलणार कधी?
ही वर्दी खोटी माणुसकीची
अरे माणसा टाक झटकूनी
आज माणसात
गरज माणूस शोधण्याची
सांग माणसा !
हा शोध संपणार कधी?

------------------------------------------------------

तू यावे आयुष्यात..


तू यावे आयुष्यात
आयुष्याला बहर यावा !
अबोल माझ्या ! जगण्याला
नवा विषय मिळावा..

तू येता आयुष्यात
आनंदाला उधाण यावे !
तुझ्या माझ्या ! संवादाला
दोन शब्द मिळावे..

तू निरर्थक माझ्या
जगण्याला नवा अर्थ द्यावा !
तू येताना ! आयुष्यात
प्रेमाचा सागर घेऊन यावा..

तू यावे आयुष्यात
तुझ्यासारखा जोडीदार हवा !
तुझ्यासवे ! चालतांना
आयुष्याला रोज नवा बहर यावा..
सुधारणार कधी..
------------------------------------------------------

सुधारणार कधी?


अरे माणसा ! कर्म काय तुझे?
तू फळं रसाळ मागतो
यात मर्म आहे खूप मोठे !
सारे कर्म तुझे निसर्ग पाहतो

वृक्ष देतो प्राणवायू
तू फळेही त्यांचीच खातो
करू पाहतो तू प्रगती !
कत्तल ! त्याच झाडांची करतो

चैन हवी तुला
तुला ऐसपैस गाडी ही हवी
मौज-मजा-मस्ती साठी !
तू बघ प्रदूषण किती वाढवतो

निसर्ग कोपतो आहे
हा कोरोना आहे त्याचीच नांदी
वेळ अजून हातात आहे !
सांग स्वतः ! तू सुधारणार कधी?

LEKHANIMITRA
FACEBOOK | INSTAGRAM | YOUTUBE

Comments

लोकप्रिय पोस्ट

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here