Posted by Er Aniket B Modake नाते जपतांना.. हलकासा धक्का काय बसतो खटकण ! काचेला तडा जातो.. मनाचही अगदी तसंच ! तोच तडा ! मनालाही जातो स्वतःला सवरण्या आधीच मन विखुरलं जातं तुकड्या तुकड्यात ! काही कळण्याआधीच नाती गोती सारं संपत जातं विखुरलेल्या त्या काचेच्या तुकड्याप्रमाने.. गोळा करायचं म्हटलं तर ! अनवाणी हाताने शक्य होत नाही ते विखुरलले तुकडे हाताला जखमा द्यायला लागतात होणारा त्रास विसरुन ! कितीही एकत्र बांधून ठेवले हे विखुरलेले तुकडे तरी ते टोचनारच कधी ना कधी म्हणून मग द्यायचे का फेकून? फक्त काच असती तर नक्कीच ! पण हे फक्त काचेचे तुकडे नाहीत बंध आहेत धागे आहेत प्रेमाचे फक्त तीक्ष्ण झालेत ! सुई च्या धारदार टोकाप्रमाने.. मला खात्री आहे नात्याचे हे धारदार तुकडे ! बदलतील एक दिवस ! मऊ आणि कोमल फुलांमध्ये.. ऊन वारा आणि पाऊस झेलत झेलत झाडा च्या विखुरलेल्या बियाप्रमाने ! येतील एकत्र गहनरुपी बदलत्या वेळेसोबत.. फुटेल कुठेतरी ! नात्यालाही मायेचा अंकुर परत एकदा होईल नात्यांची गर्दी त्या बागेतील रोपट्यांसारखी ! एकत्रित आणि एकसंघ अशी.... ------------------------------------------------------ शोध संपण...
Post by LekhaniMitraa "निसर्ग ! ज्याने जीवन जपलंय निसर्गाची हानी करून स्वार्थी माणसाने मात्र स्वतःच्याच पाठीत खंजीर खुपसलंय" ------------------------------------------- " प्रेम ! दोन जीवांना एकत्र गुंफनारा एक अनमोल धागा" ------------------------------------------- "आयुष्यात माझा तू रंग बनून यावें बेरंग जगण्याला आज तू रंगीन करून जावें" ------------------------------------------- "मित्र म्हणजे दोस्त, सखा ज्याच्याविना संवादच सारा मुका" ------------------------------------------- "डोक्यावर ढीगभर दुःख असतानाही हसून जगण्यात एक वेगळीच मज्जा आहे" ------------------------------------------- "मजबुरी ! प्रगतीला बसलेली एक भावनिक खीळ" ------------------------------------------- "सौंदर्य क्षणिक आहे प्रेम करायचं असेल तर एका सुंदर मनावर करा" ------------------------------------------- "आदर ! माणसाला माणूस बनवतो" --------------------...
Post by Lekhanimitraa Pune वेळ.. वेळ खूप ताकतवान असते माणसाला माणसाची औकात दाखवायची ताकत वेळेत असते.. वेळ माणसाला जगायला शिकवते स्वार्थीपणाचा माज केल्यावर माणसाला होत्याचं नव्हतं करून टाकते.. वेळ माणसाला माणूस बनवते वेळ देऊनही धडा न घेणाऱ्याची पुरती वाट लावण्याची हिम्मत वेळेत असते.. वेळ माणसाला माणुसकी शिकवते माणसाचा मी पणाचा घडा भरतो भरलेला घडा फोडण्याचं काम वेळ करते.. वेळ खूप काही शिकवते झालं गेलं विसरून आयुष्यात माणसाला पुढे चालायला वेळच शिकवते.. वेळ माणसाला आधार देते वेळ कठोर तितकीच दयाळू असते वाईट वेळेला माणसाला वेळ च रस्ता दाखवते.. ----------------------------------------- वेळ.. जीवनाला मिळालेली एक अनमोल देणगी म्हणजे वेळ.. विनामूल्य असूनही मौल्यवान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे वेळ.. आयुष्यात पुढे घेऊन जाणारा एक प्रामाणिक जोडीदार म्हणजे वेळ.. आपल्याला आरसा दाखवणारा आयुष्यातला एक सच्या दोस्त म्हणजे वेळ.. आयुष्याची दशा अन् दिशा ठरवणारं होकायंत्र म्हणजे वेळ.. आयुष्यात सापशिडीचा अनुभव चालता चालता देणारी गोष्ट म्हणजे वेळ.. बरोबर ते बरोबर आणि चूक ते चूक तिथल्या...
Comments
Post a Comment