Posts

वेळ | कविता संग्रह | Read Here

Image
Post by Lekhanimitraa Pune वेळ.. वेळ खूप ताकतवान असते माणसाला माणसाची औकात दाखवायची ताकत वेळेत असते.. वेळ माणसाला जगायला शिकवते स्वार्थीपणाचा माज केल्यावर माणसाला होत्याचं नव्हतं करून टाकते.. वेळ माणसाला माणूस बनवते वेळ देऊनही धडा न घेणाऱ्याची पुरती वाट लावण्याची हिम्मत वेळेत असते.. वेळ माणसाला माणुसकी शिकवते माणसाचा मी पणाचा घडा भरतो भरलेला घडा फोडण्याचं काम वेळ करते.. वेळ खूप काही शिकवते झालं गेलं विसरून आयुष्यात माणसाला पुढे चालायला वेळच शिकवते.. वेळ माणसाला आधार देते वेळ कठोर तितकीच दयाळू असते वाईट वेळेला माणसाला वेळ च रस्ता दाखवते.. ----------------------------------------- वेळ.. जीवनाला मिळालेली एक अनमोल देणगी म्हणजे वेळ.. विनामूल्य असूनही मौल्यवान असलेली एकमेव गोष्ट म्हणजे वेळ.. आयुष्यात पुढे घेऊन जाणारा एक प्रामाणिक जोडीदार म्हणजे वेळ.. आपल्याला आरसा दाखवणारा आयुष्यातला एक सच्या दोस्त म्हणजे वेळ.. आयुष्याची दशा अन् दिशा ठरवणारं होकायंत्र म्हणजे वेळ.. आयुष्यात सापशिडीचा अनुभव चालता चालता देणारी  गोष्ट म्हणजे वेळ.. बरोबर ते बरोबर आणि चूक ते चूक तिथल्या...

मिनाक्षी

Image
Post by Lekhanimitra मिनाक्षी: एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीनाक्षीचा "मिनी" ते "मिस वर्ल्ड मिनाक्षी" हा प्रवास एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीनाक्षीचा "मिनी" ते "मिस वर्ल्ड मिनाक्षी" हा प्रवास या कथेतून मांडला आहे.. गोरा रंग सडपातळ बांधा, सरळ नाक आणि काळेभोर टपोरे डोळे एकंदरीत एखाद्या नटीला ही लाजवेल अशी रेखीव शरीर रचना असलेली मिनाक्षी. अगदी साधारण जेमतेम कुटुंबात मिनाक्षीचा जन्म झाला. आई वडील पारंपरिक शेती करायचे. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मीनाक्षीच्या वडिलांचे नाव गणोबा. अडाणी माणूस बोटावर हिशेब करता येईल एवढी त्याची शैक्षणिक ऐपत. कष्ट तर त्याच्या पाचवीलाच पुजलेले. गणोबा नेहमी म्हणायचा "कितीबी कष्ट करीन एक टाईमाला उपाशी राईन पण माया मिनीला मला मास्तरीन करायची हाय. गणोबाची परिस्थिती पाहता कर्जाचा बोजा डोक्यावर त्यात शेतीवर आडमाप खर्च झालेला. उत्पन्न एवढं की खर्च ही निघेल की नाही याची शाश्वती नाही. गनोबाजवळ आता कवडी ही शिल्लक नव्हती. मिनिला तर शाळेत घालायची आहे. गणोबा ची प्रचंड धडपड सुरू होती. याच्या त्याच्या पाया पडला मिनी ची फी भराय...

दिनविशेष : शिव राज्याभिषेक

Image
Posted by M2Marathi आदर्श राजा म्हणून आदराने माझ्या राजाचा इतिहासात उल्लेख केला जातो. उत्कृष्ठ शाषक ज्यांच्यासाठी सदैव प्रजा प्रथम राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वास्तव दर्शी राजा सोळाव्या शतकात मराठी मातीला लाभला. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आचार आणि विचारांनी आजही मराठी जन माणसाच्या मनामनात खोलवर रुजलेले आहेत.. आजही महाराष्ट्र त्यांच्याच अदर्शावर चालतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी अंकित आहे.. जिजा मातेने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं माझ्या राज्याने मुठभर मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. एक मावळा एक लाखावर भारी हे दाखवून दिलं स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मातीला अनोखं रत्न मिळालं आजच्या दिवशी ६ जून १६७४ ला रायगडावर शिव राज्याभिषेक झाला. आई जगदंबेच्या साक्षीने छत्रपतींनी माता जिजाऊ च स्वप्न पूर्ण केलं. श्रीमान रायगड आजही या गोष्टीची साक्ष देत आहे.. M2Marathi पोस्ट आवडल्यास शेअर करा..

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

Image
Post by LekhaniMitraa "निसर्ग ! ज्याने जीवन जपलंय निसर्गाची हानी करून स्वार्थी माणसाने मात्र स्वतःच्याच पाठीत खंजीर खुपसलंय" ------------------------------------------- " प्रेम ! दोन जीवांना एकत्र गुंफनारा एक अनमोल धागा" ------------------------------------------- "आयुष्यात माझा तू रंग बनून यावें बेरंग जगण्याला आज तू रंगीन करून जावें" ------------------------------------------- "मित्र म्हणजे दोस्त, सखा ज्याच्याविना संवादच सारा मुका" ------------------------------------------- "डोक्यावर ढीगभर दुःख असतानाही हसून जगण्यात एक वेगळीच मज्जा आहे" ------------------------------------------- "मजबुरी ! प्रगतीला बसलेली एक भावनिक खीळ" ------------------------------------------- "सौंदर्य क्षणिक आहे प्रेम करायचं असेल तर एका सुंदर मनावर करा" ------------------------------------------- "आदर ! माणसाला माणूस बनवतो" --------------------...

कविता संग्रह (संच) | 01. एक नातं | 02. मला तुझ्यासोबत जगायचं होतं | 03. जेव्हा तुझी आठवण येते

Image
Post by Lekhanimitraa Pune एक नातं.. एक नातं तुझ्या माझ्या प्रेमाचं हे गुपित, नव्हतं कधी उलगडायचं.. एक नातं अतूट विश्वासाचं ठरवलं होतं, दोघांनीही ते निभवायचं.. एक नातं नेहमीच बहरलेलं देखावा नको, हे मात्र ठरलेलं.. एक नातं एकमेकांत गुंतलेलं दोघांनीही ते, मनापासून जपलेलं.... -------------------------------- मला तुझ्या सोबत जगायचं होतं.. मला तुझ्या सोबत जगायचं होतं हातात हात घेऊन आयुष्यभर चालायचं होतं, चालून चालून थकल्यावर क्षणभर तुझ्याजवळ बसायचं होतं.. मला तुझ्या सोबत जगायचं होतं तुझ्या सोबत आयुष्य घडवायचं होतं, आपण एकत्र असताना आयुष्याचं गणित तुझ्याकडून शिकायचं होतं.. मला तुझ्या सोबत जगायचं होतं खरं प्रेम काय असतं हे जगाला दाखवायचं होतं, कधी निर्णय चुकल्यावर माझ्या पाठीशी उभा तुला पाहायचं होतं.. मला तुझ्या सोबत जगायचं होतं तुझ्यासाठी जगासोबत लढायचं होतं, ही लढाई जिंकल्यावर आयुष्य तुझ्यासोबत जगायचं होतं.. -------------------------------- एक नातं.. एक नातं कधीच संपलेलं.. एक नातं एकमेकांपासून दुरावलेलं.. एक नातं एकटं एकटं पडलेलं.. एक नातं एकमेकांपासून दूर...

कविता संग्रह | 01. नको नको वाटे | 02. का कळेना | 03. नाते तुटलेले | 04. आज तू परत माझी व्हावी

Image
Post by Lekhanimitraa Pune नको नको वाटे.. नको नको वाटे असे जगणेच आता, आयुष्य बनले तुटलेले खेळणे आता.. उरलो कुठेच नाही बघ माझाच मी आता, फिरविली पाठ माझिया नशिबानेच आता.. तूच सोबती आता हो सखा सारथी माझा, हो तूच माय माझी अन् तूच बाप माझा.. नको नको देवा नको अंत पाहू आता, हा जन्म माझा लागुदे जरा कारणी आता.. -------------------------------- का कळेना.. का कळेना आज मजला भास का हे निराळे, आठवणीत त्या रमूनी नयन अश्रू ढाळे.. कळेना आज मजला भान का हे हरपले, बेभान होऊनी मी स्वप्नांत तुझ्या रमले.. का कळेना आज मजला हुरहूर मनी दाटे, निराळे आहोत परी श्वास तो एक वाटे.. -------------------------------- नातें तुटलेले.. विरून गेलेत धागे आता कधीकाळी अतूट असलेले सांगा कुणी गाठ मारू कशी ना हातात काही उरलेले.. विरून गेलेत सारे नाते आता हातही रिक्त झालेले सांगा आज लाऊ रास कशी गुंफू एकत्र कसे क्षण हरलेले.. झाले गेले विसरून सारे हे नाते नव्याने विनवावे जमवून सारे धागे दोरे जुने क्षण एकदा एकत्र जगावे.. विफल राहती रे प्रयत्न सारे जो तो इथे आपलीच हाकी भावनांचे उतरले भाव रे तोडून ना...

कविता संग्रह (संच) | 01. आज ऐकून तुला | 02. सप्तरंगची उधळण तू | 03. तुला पाहताना | 04. लाईफ

Image
Post by Lekhanimitraa Pune आज ऐकून तुला.. आज ऐकून तुला शब्दांना पान्हे फुटले, पाहूनी दुःख तुझे आसवांना रडू फुटले.. कळले नाही नेमके कुणाचे काय चुकले, ऐकुनी बोल केविलवाणे हृदयाचे ठोके चुकले.. समजुनी सांगू कसे प्रेमवेडे शब्द संपले, आठवांना भरती आली अन् क्षणात सारे संपले.. पाहूनी दुःख तुझे, आसवांना रडू फुटले.. -------------------------------- सप्तरंगांची उधळण तू.. सप्तरंगांची उधळण तू जणू ऊन पावसात इंद्रधनु, सप्तसुरांची सरगम तू सोबतीने प्रेम-गीत गाऊ.. पौर्णिमेचा उजळ चांद तू शीतल छाया रातीला जणू, सुर नवा आयुष्याला तू जगण्यात नवा राग छेडू.. ही तुझी चंचल गाणी सरगम मनाची छेडून जाती, शब्द बोलकी गाण्यातली हे तीर मनाला भेदून जाती.. प्रेम हे सप्तरंगी रेशिमधागे जुळून येती, साथ तुझीया प्रितीची अलगद मनाला स्पर्शून जाती.. -------------------------------- तुला पाहताना.. हे निळसर चंचल तुझे नयन बावरे, धारदार कटाक्ष नजरेचा टाकती नयन सावरे.. छटा अनोखी ही गुलाबी गोऱ्या गाली रेखाटने, केस मोकळे तुझे दृश्य मनमोहक देखणे.. ओठ गुलाबी तुझे खुलली ओठांवर लाली, अलवार नाजूक खळी आज उठ...

कविता संग्रह 003 | 01. मला मैत्री आवडते | 02. बघता-बघता | 03. तुझ्यासाठीच | 04. मागे वळून बघ एकदा

Image
Post by Lekhanimitraa Pune मला मैत्री आवडते.. मला मैत्री आवडते मैत्रीण म्हणून तू आवडते तू हसते कधी रुसते कधी तुझी हीच नौटंकी मला आवडते मला मैत्री आवडते मनातलं ऐकणारी तू आवडते तू हसते अन् मलाही हसवते तुझी हीच अदा मला आवडते मला मैत्री आवडते मन ओळखणारी तू आवडते मैत्रीसाठी चाललेली ती तुझी धडपड मला आवडते मला मैत्री आवडते मैत्रीवर जीव ओतनारी तू आवडते हसते हसवते तू रडते कधी रडता रडता हसणारी तू आवडते.. -------------------------------------------- बघता-बघता.. बघता-बघता सूर्य झुकायला गेला, आता संध्याकाळ होईल.. आज परत एकदा मनातल्या मनात, जुन्या आठवणींची उजळणी सुरू होईल.. बघता बघता ! तुझ्या आठवणींत, मन रमत जाईल.. आज परत एकदा डोळ्यातल्या पाण्याला, दुथडी भरून पूर येईल.. -------------------------------------------- तुझ्यासाठीच.. तुझ्यासाठीच लढलो आजवर झगडलो मी मरमर माझी कधी तुला कळलीच नाही.. तुझ्यासाठीच हरलो जिंकलेला साराच डाव मी तळमळ माझी कधी तुला कळलीच नाही.. तुझ्यासाठीच जगलो तुला एक नजर पाहण्यासाठी चाललेली धडपड माझी कधी तुला कळलीच नाही.. तुझ्यासाठीच संपलो आज प्रे...