दिनविशेष : शिव राज्याभिषेक

Posted by M2Marathi


आदर्श राजा म्हणून आदराने
माझ्या राजाचा
इतिहासात उल्लेख केला जातो.
उत्कृष्ठ शाषक
ज्यांच्यासाठी सदैव प्रजा प्रथम राहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा
वास्तव दर्शी राजा
सोळाव्या शतकात मराठी मातीला लाभला.
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या
आचार आणि विचारांनी
आजही मराठी जन माणसाच्या मनामनात
खोलवर रुजलेले आहेत..
आजही महाराष्ट्र त्यांच्याच अदर्शावर चालतो
म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
महाराष्ट्राच्या इतिहासात
आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी अंकित आहे..
जिजा मातेने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं
माझ्या राज्याने मुठभर मावळ्यांच्या साथीने
स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
एक मावळा
एक लाखावर भारी हे दाखवून दिलं
स्वराज्याची स्थापना झाली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने
महाराष्ट्राच्या मातीला अनोखं रत्न मिळालं
आजच्या दिवशी
६ जून १६७४ ला रायगडावर
शिव राज्याभिषेक झाला.
आई जगदंबेच्या साक्षीने
छत्रपतींनी माता जिजाऊ च स्वप्न पूर्ण केलं.
श्रीमान रायगड आजही या गोष्टीची साक्ष देत आहे..

M2Marathi
पोस्ट आवडल्यास शेअर करा..

Comments

लोकप्रिय पोस्ट

कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here