कविता संग्रह | 01. नको नको वाटे | 02. का कळेना | 03. नाते तुटलेले | 04. आज तू परत माझी व्हावी

Post by Lekhanimitraa
Pune


नको नको वाटे..

नको नको वाटे
असे जगणेच आता,
आयुष्य बनले
तुटलेले खेळणे आता..

उरलो कुठेच नाही
बघ माझाच मी आता,
फिरविली पाठ
माझिया नशिबानेच आता..

तूच सोबती आता
हो सखा सारथी माझा,
हो तूच माय माझी
अन् तूच बाप माझा..

नको नको देवा
नको अंत पाहू आता,
हा जन्म माझा
लागुदे जरा कारणी आता..
--------------------------------

का कळेना..

का कळेना आज मजला
भास का हे निराळे,
आठवणीत त्या रमूनी
नयन अश्रू ढाळे..

कळेना आज मजला
भान का हे हरपले,
बेभान होऊनी मी
स्वप्नांत तुझ्या रमले..

का कळेना आज मजला
हुरहूर मनी दाटे,
निराळे आहोत परी
श्वास तो एक वाटे..
--------------------------------

नातें तुटलेले..

विरून गेलेत धागे आता
कधीकाळी अतूट असलेले
सांगा कुणी गाठ मारू कशी
ना हातात काही उरलेले..

विरून गेलेत सारे नाते
आता हातही रिक्त झालेले
सांगा आज लाऊ रास कशी
गुंफू एकत्र कसे क्षण हरलेले..

झाले गेले विसरून सारे
हे नाते नव्याने विनवावे
जमवून सारे धागे दोरे
जुने क्षण एकदा एकत्र जगावे..

विफल राहती रे प्रयत्न सारे
जो तो इथे आपलीच हाकी
भावनांचे उतरले भाव रे
तोडून नाती सारे स्वार्थी..
--------------------------------

आज तू परत माझी व्हावी..

एकांत अशा संध्याकाळी
तुझी माझी भेट व्हावी,
ऊने दुने विसरून सारे
आज तू परत माझी व्हावी..

एकांत अशा संध्याकाळी
अशी ही वेळ यावी,
बोलता बोलता नकळत
तू मला घट्ट मिठी मारावी..

एकांत अशा संध्याकाळी
नजरेला तुझी नजर भिडावी,
कळत नकळत आज
नजरेला नजरेची भाषा कळावी..

उणे-दुणे विसरून सारे
आज तू परत माझी व्हावी..

धन्यवाद
Team LekhaniMitra

Comments

लोकप्रिय पोस्ट

कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here