कविता संग्रह (संच) | 01. आज ऐकून तुला | 02. सप्तरंगची उधळण तू | 03. तुला पाहताना | 04. लाईफ
Post by Lekhanimitraa
Pune
आज ऐकून तुला..
आज ऐकून तुला
शब्दांना पान्हे फुटले,
पाहूनी दुःख तुझे
आसवांना रडू फुटले..
कळले नाही नेमके
कुणाचे काय चुकले,
ऐकुनी बोल केविलवाणे
हृदयाचे ठोके चुकले..
समजुनी सांगू कसे
प्रेमवेडे शब्द संपले,
आठवांना भरती आली
अन् क्षणात सारे संपले..
पाहूनी दुःख तुझे,
आसवांना रडू फुटले..
--------------------------------
सप्तरंगांची उधळण तू..
सप्तरंगांची उधळण तू
जणू ऊन पावसात इंद्रधनु,
सप्तसुरांची सरगम तू
सोबतीने प्रेम-गीत गाऊ..
पौर्णिमेचा उजळ चांद तू
शीतल छाया रातीला जणू,
सुर नवा आयुष्याला तू
जगण्यात नवा राग छेडू..
ही तुझी चंचल गाणी
सरगम मनाची छेडून जाती,
शब्द बोलकी गाण्यातली
हे तीर मनाला भेदून जाती..
प्रेम हे सप्तरंगी
रेशिमधागे जुळून येती,
साथ तुझीया प्रितीची
अलगद मनाला स्पर्शून जाती..
--------------------------------
तुला पाहताना..
हे निळसर चंचल
तुझे नयन बावरे,
धारदार कटाक्ष नजरेचा
टाकती नयन सावरे..
छटा अनोखी ही गुलाबी
गोऱ्या गाली रेखाटने,
केस मोकळे तुझे
दृश्य मनमोहक देखणे..
ओठ गुलाबी तुझे
खुलली ओठांवर लाली,
अलवार नाजूक खळी
आज उठून दिसते गाली..
पहाण्या नजारा सौंदर्याचा
ओढ मनाला लागली,
देखण्या फुला तुला
माझीच ना नजर लागावी..
--------------------------------
एक आठवण..
मैत्रीच्या कट्ट्यावर
आठवणीं ची
शाळा भरायची..
विषय नेहमीचे
एक एक आठवण
हवी वाटायची..
मैत्रीची मैफिल
रोज संध्याकाळी
चांगलीच रंगायची..
कुणाचा टाका
कुठं भिडलाय
मैत्रीच्या कट्टयावर
सारी पोलखोल व्हायची..
धन्यवाद
Team Lekhanimitra
Comments
Post a Comment