कविता संग्रह 003 | 01. मला मैत्री आवडते | 02. बघता-बघता | 03. तुझ्यासाठीच | 04. मागे वळून बघ एकदा

Post by Lekhanimitraa
Pune

मला मैत्री आवडते..


मला मैत्री आवडते
मैत्रीण म्हणून तू आवडते
तू हसते कधी रुसते कधी
तुझी हीच नौटंकी मला आवडते

मला मैत्री आवडते
मनातलं ऐकणारी तू आवडते
तू हसते अन् मलाही हसवते
तुझी हीच अदा मला आवडते

मला मैत्री आवडते
मन ओळखणारी तू आवडते
मैत्रीसाठी चाललेली ती
तुझी धडपड मला आवडते

मला मैत्री आवडते
मैत्रीवर जीव ओतनारी तू आवडते
हसते हसवते तू रडते कधी
रडता रडता हसणारी तू आवडते..
--------------------------------------------

बघता-बघता..

बघता-बघता
सूर्य झुकायला गेला,
आता संध्याकाळ होईल..

आज परत एकदा
मनातल्या मनात,
जुन्या आठवणींची
उजळणी सुरू होईल..

बघता बघता !
तुझ्या आठवणींत,
मन रमत जाईल..

आज परत एकदा
डोळ्यातल्या पाण्याला,
दुथडी भरून पूर येईल..
--------------------------------------------

तुझ्यासाठीच..

तुझ्यासाठीच लढलो
आजवर झगडलो मी
मरमर माझी
कधी तुला कळलीच नाही..

तुझ्यासाठीच हरलो
जिंकलेला साराच डाव मी
तळमळ माझी
कधी तुला कळलीच नाही..

तुझ्यासाठीच जगलो
तुला एक नजर पाहण्यासाठी
चाललेली धडपड माझी
कधी तुला कळलीच नाही..

तुझ्यासाठीच संपलो
आज प्रेमाच्या खेळातून मी
घालमेल जीवाची
कधी तुला कळलीच नाही..
--------------------------------------------

मागे वळून बघ एकदा..

नदीच्या किनाऱ्यावर
सायंकाळच्या अंधुक प्रकाशात
असेल मी एकटाच
तू मागे वळून बघ एकदा..

रात्रीच्या चांदण्यात
उंचवटी माळरानी एकांतात
दिसेल मी एकटाच
तू मागे वळून बघ एकदा..

आठवांच्या दुनियेत
विसरून स्वतःला रात्र जागताना
दिसेल मी एकटाच
तू मागे वळून बघ एकदा..

रोजच्या जगण्यात
क्षणाक्षणात तुला शोधताना
दिसेल मी एकटाच
तू मागे वळून बघ एकदा.. 😭
--------------------------------------------
धन्यवाद
Team Lekhanimitra

Comments

लोकप्रिय पोस्ट

कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here