आयुष्य..
Post by Lekhanimitra
आयुष्य खूप सुंदर आहे हसून जगता आलं पाहिजे
सुख अनुभवता आणि दुःख पचवता आलं पाहिजे!
![]() |
| Ayushya_lekhanimitra.com |
तर मित्रांनो आज आयुष्य या सुंदर विषयावर थोडंस मन मोकळं करूया..
आयुष्य म्हणजे काय असतं?
आपण जन्माला येतो ऊन वारा पाऊस झेलत लहानाचे मोठे होतो. राबराब राबतो पैसा कमवतो. शेवटी मुलाबाळांच्या हातात आयुष्याची कमाई देऊन हे जग सोडून जातो.
जन्माला आल्यापासून हे जग सोडून जाईपर्यंत चा प्रवास म्हणजे आयुष्य. ही आयुष्याची सर्वसामान्य व्याख्या झाली.
खरं आयुष्य म्हणजे काय? आयुष्य आपण कसं जगतोय? आणि कसं जगायला हवं! याबद्दल थोडी चर्चा आपण आज करूया.
आयुष्य म्हणजे फक्त पैसा कमावणे हा आयुष्याचा अर्थ नाही. आयुष्य जगायचं म्हटलं तर पैसा निश्चित आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे. पण पैसा आयुष्यातला फक्त एक पैलू झाला. समाधान, मैत्री, स्नेह, प्रेम, आरोग्य, खेळ, बचत, दान असे अनेक महत्त्वाचे पैलू असतात जे आत्मसात केले तर खरं आयुष्य जगल्याचा छान अनुभव माणसाला येईल.
आज आयुष्याचा खरा अर्थ आपण समजून घेऊ. आयुष्य जगताना नेहमी एका पारड्यात पैसा आणि दुसऱ्या पारड्यात समाधान मैत्री, प्रेम, आरोग्य, बचत, दान या गोष्टी असतात.
आयुष्याची मौज लुटायची असेल तर आयुष्य जगताना माणसाने नेहमी आयुष्याची दोन्ही पारडी समांतर कशी ठेवता येतील हा प्रयत्न केला पाहिजे.
मित्रांनो खरं आयुष्य म्हणजे काय अनुभवायचे असेल तर खाली दिलेल्या काही गोष्टी आयुष्यात अमलात आना. सुखी व्हाल समाधानी राहाल..
१. आयुष्यात समाधानी राहा माणसं जवळ येतील.
२. आयुष्यात मैत्री करा मित्र आयुष्याला आधार देतील.
३. आयुष्यात प्रेम करा नाती कधीच तुटणार नाहीत.
४. आयुष्यात आरोग्य संपदा वाढवा शरीर साथ सोडणार नाही.
५. आयुष्यात बचत करा तुम्ही कधीच हतबल होणार नाहीत
६. आयुष्यात दान करा तुमच्यावर कधीच वाईट वेळ येणार नाही..
मित्रांनो पोस्ट आवडल्यास शेअर करा!

Comments
Post a Comment