आर्थिक बचत

Post by
Lekhanimitra

1. आर्थिक बचत म्हणजे काय?
Saving

अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर "एकूण उत्पन्नाच्या तुलनेत खर्च करून उरलेली काही टक्के शिल्लक रक्कम म्हणजे आर्थिक बचत."

2. आर्थिक बचतीची गरज?


Requirements


मित्रांनो आपण एकविसाव्या शतकात आहोत. आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दृष्टीने आजच्या दैनंदिन आयुष्यात आर्थिक व्यवस्थापन खूप गरजेचे बनले आहे.
वर्तमानात केलेली बचत आपल्याला चांगलं भविष्य देऊ शकते. एकंदरीत भविष्याच्या दृष्टीने आर्थिक बचत एक अति महत्वाचा पैलू आहे.

3. आर्थिक आवक आणि खर्च ( विश्लेषण )


Income vs expense


आपल्या आजच्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच आर्थिक संकटांना सामोरे जात असतो. मासिक आवक आणि एकूण खर्च बरेचदा ताळमेळ बसत नाही.
अनेकदा अशी तक्रार असते की जेव्हा आवक कमी असायची तरी तीच बचत आणि आता आवक वाढली आहे तरीही तीच परिस्थिती.

मित्रानो या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण एकविसाव्या शतकात आहोत. दिवसेंदिवस महागाई ही वाढतच चालली आहे. त्याप्रमाणे समाजात जीवनावश्यक वस्तू ऐवजी चैनीच्या वस्तू खरेदीवर जास्तीचा भर दिला जात आहे. त्यामुळे जरी आवक वाढली तरी खर्चही वाढले आहेतच. अशा प्रकारे आपल्याकडे जास्तीच्या खर्च असल्याकारणाने एकंदरीत बचत कमी होत असते.

बऱ्याच आर्थिक अडचणी अशा असतात की त्या सांगून येत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर वैद्यकीय खर्च असतील. आर्थिक आवक त्यामधील चढ उतार असेल. मग अशावेळी अचानक येणाऱ्या आर्थिक संकटात माणूस पुरता गुरफटून जातो. संकटाशी दोन हात करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद त्याच्याकडे नसते. अशावेळी आर्थिक अडचणीत माणूस नेहमी "कर्ज" हा पर्याय स्वीकारतो.
अतिरिक्त खर्च, कमी बचत आणि आर्थिक व्यवस्थापनाचा अभाव यामुळे माणूस आर्थिक अडचणी मधे मग गुरफटला जातो.

4. आर्थिक विश्लेषण कसे कराल?


Analysis

आर्थिक विश्लेषण करताना काही ठळक गोष्टी लक्षात घ्यावे लागतील. खर्च कमी करायचे असतील तर त्यासाठी खर्चाच वर्गवारी आपण करू शकतो. खर्चाची वर्गवारी करताना प्राथमिक खर्च आणि दुय्यम खर्च या प्रकारात वर्गवारी करावी.

प्राथमिक खर्चामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असावा. त्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा यासंबंधी खर्च येतील.
दुय्यम खर्चामध्ये चैनीच्या वस्तू यावर होणारा खर्च समाविष्ट करावा. उदा. मोबाईल, गाडी इत्यादी.

दुय्यम खर्च या वर्गवारी मध्ये येणाऱ्या गोष्टी वर जास्त लक्ष केंद्रित करावे. शक्य तेवढी जास्तीची बचत याच वर्गवारी मध्ये आपण करू शकतो. यासाठी प्रथम आणि दुय्यम वर्गवारी मधील प्रत्येक गोष्टीला खर्चाचं एक लक्ष ठरवून द्यावे लागेल. हे लक्ष त्या गोष्टीसाठी न्यूनतम किती खर्च करावा ही किंमत दर्शवेल.
रोज होणारा खर्च हा वर्गवारीनुसार रोजच्या रोज घेतला जावा. यासाठी खर्च व्यवस्थापन वही किंवा आधुनिक "Daily Expense" यांसारखी अँड्रॉइड ॲप्स देखील बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो. आर्थिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने "मोबाईल ॲप" हा एक उत्तम पर्याय आहे.

आर्थिक विश्लेषणाचा अभ्यास करताना मासिक अहवालाचा अभ्यास करावा. जेणेकरून खर्चाची अचूक आकडेवारी आपल्याला भेटेल.

5. खर्च कमी कसे कराल?
How to minimize expenses

प्रथम वर्गवारी मध्ये येणाऱ्या गोष्टींबद्दल व्यवस्थित विश्लेषण करून आपण जास्तीचे खर्च होत असतील तर त्याठिकाणी आपण बचत करू शकतो.

प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही वर्गवारी मध्ये खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आर्थिक विश्लेषण हा मुद्दा खूप महत्त्वाचा बनतो.
एका महिन्याचे आर्थिक विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे दोन्ही वर्गवारी मधून ज्या कारणासाठी जास्तीचा खर्च झाला आहे ते ठळक मुद्दे असतील.

उदा.
१. Mobile Bill: 1500/800rs
२. TRANSPORT: 3000/1500rs
३. Grossary: 3200/2800s

Mobile Bill, Transport, Grossary इत्यादी. हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले मुद्दे झाले. तुमचे आर्थिक खर्चाचे मुद्दे वेगवेगळे असू शकतात. याठिकाणी मुद्दा क्रमांक एक मध्ये मोबाईल बिल 1500rs हा एकंदरीत झालेला खर्च आहे व 800rs हे आपण ठरवलेला न्यूनतम खर्च आहे.

वरचे मुद्दे पाहता आपल्या न्यूनतम गरजेपेक्षा अधिक खर्च आपण या गोष्टीवर केला आहे. आता इथूनच आपल्याला बचत करायला सुरुवात करता येईल.
जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन खर्चाचा विश्लेषण काढाल तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की बरेचसे मुद्दे असे आहेत ज्या गोष्टीवर आपण आपल्या गरजेपेक्षा जास्तीचा खर्च करत आहोत.

आता तुम्हाला एकच करावे लागेल ज्या गोष्टी वर गरजेपेक्षा जास्त चा खर्च होत आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याठिकाणी शक्य तेवढा कमी खर्च करत जास्तीची बचत करावी..

आम्ही सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही उपयोगात आणल्या तर नक्कीच तुमच्या एकूण बचती मध्ये लक्षणीय वाढ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे..
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा..


धन्यवाद!

Comments

लोकप्रिय पोस्ट

कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?

मराठी स्टेटस | सुविचार | चित्र चारोळी | संग्रह (संच)

वेळ | कविता संग्रह | Read Here